Crime
ESakal
नागपूर - बेलतरोडी परिसरात वृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या कथित चोराला नागरिकांनी पकडून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली.
सुमेध गजभिये असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.