Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; फेसबुकवरून झाली होती मैत्री ; डॉक्टरला छिंदवाड्यातून अटक

Nagpur Crime, Doctor Arrested, Marriage Promise Case प्रकरणात फेसबुकवरून २७ वर्षीय तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याच्या आरोपावरून डॉक्टरला छिंदवाड्यातून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली असून सदर पोलिस तपास करीत आहेत.
Crime

Crime

esakal

Updated on: 

नागपूर, : फेसबुकवरून २७ वर्षीय तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून सदर पोलिसांनी डॉक्टरला मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथून अटक केली. संजय सुधीर विश्वास (२८, रा. गोणी बिछुआ, जि. छिंदवाडा) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खासगी क्षेत्रात नोकरी करते. फेसबुकच्या माध्यमातून तिची संजयशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर संजयने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने तरुणीला वेगवेगळ्या हॉटेल्स तसेच अन्य ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

काही दिवसानंतर तरुणीने संजयकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने धमकावत लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. यानंतर दोघांत वाद झाला. तरुणीने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी छिंदवाडा येथून संजयला अटक केली. शुक्रवारी (ता. २) दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सदर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com