कामठी : निर्माल्य विसर्जनासाठी पतीसोबत आलेल्या विवाहितेने अचानक नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कन्हान नदीवरील (Kanhan River) नेरी पुलावर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वरी विजय साकोरे (२३, रा. न्यू अमरनगर, मानेवाडा, नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.