Nagpur Crime: फोनवर मोठ्याने बोलण्यावरून झाला वाद, बापानेच डोक्यात रॉड घालून मुलाला संपवलं

Man Kills his Son: नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बापाने आपल्या मुलाची हत्या केली आहे
Nagpur Crime
Nagpur Crime

Nagpur Crime: नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बापाने आपल्या मुलाची हत्या केली आहे. कारण काय तर, बाप फोनवर मोठ्याने बोलत असल्याने मुलानं त्याला डिवलचं होतं. नागपूर जिल्ह्यापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरा गावातील ही घटना आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Crime Man Kills Son For Objecting To His Loud Phone Call Both Were Drunk)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामराव काकडे हा फोनवरुन मोठ्याने बोलत होता. याचा राग त्याचा मुलगा सुरज काकडे याला आला. त्याने बापाला हळू बोलण्याचा सल्ला दिला. या मुद्द्यावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरामध्ये रामराव यांनी एका लोखंडी रॉडने आपल्या मुलावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रसंगावेळी मुलगा आणि बाप दोघे मद्याच्या अमलाखाली होते.

Nagpur Crime
Nagpur Crime: मद्यधुंदीत मित्रानींच केला ‘गेम’, कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, हत्येचं कारण समोर

सुरजला गंभीर जखम झाली होती. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी रामराव काकडेला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी बापाला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून अधिक तपास सुरु आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com