कॅटरिंग’च्या नावावर मानवी तस्करी! अंमली पदार्थांचाही समावेश

नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या लक्ष्मी हॉटेलच्या मालकासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली
Nagpur crime News Drugs Human trafficking name of catering Police arrested six
Nagpur crime News Drugs Human trafficking name of catering Police arrested six

नागपूर : ‘कॅटरिंग’ व्यवसाय आणि इव्हेंटच्या नावाने महिला आणि तरुणींना देशभरात नेऊन त्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ आणि तरुणींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका ‘ऑडिओ कॉल’ वरून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. याप्रकरणी नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या लक्ष्मी हॉटेलच्या मालकासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अभिषेक ललित पांडे, सोनू ठाकूर हे अमली पदार्थ तस्करी आणि मानवी तस्करीमध्ये विशाल उर्फ दत्तू अंबद दाभणे, सचिन इंगळे, निखिल उर्फ सत्यजित रमेश बांगडे, विक्की भोसले अशी आरोपींची नावे आहेत.

अभिषेक पांडे याचा कॅटरिंग आणि इव्हेंटचा व्यवयाय आहे. त्याचे वडील पॅरामिलीट्री फोर्समध्ये नोकरीला आहे. २५ तारखेला पोलिसांना एक ऑडिओ क्लिप मिळाली. त्या आधारावर तपासास सुरुवात झाली. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी अभिषेक पांडे हा ओडिशातील संबलपूर येथून गांजा व इतर अंमली पदार्थ आण असल्याची माहिती मिळाली. त्याआधारावर त्याच्या गाडीची तपासणी केल्यावर त्यात गांजा व अंमली पदार्थ आढळून आल्याने अभिषेक आणि सोनू ठाकूर यास अटक करण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीची देहव्यापार करण्यासाठी अल्पवयीन मुलीला बोलावीले होते. त्यावेली विक्की भोसले याने मारहाण केली होती. ती अभिषेकची मैत्रिण होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यातून ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात पोलिसांनी तरुणींची तस्करी, विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत चार आरोपींना अटक केली. विशाल उर्फ दत्तू (गोंदिया), अंबद दाभणे, सचिन इंगळे, निखिल उर्फ सत्यजित रमेश बांगडे, विक्की भोसले यांना अटक केली. एवढेच नव्हे तर या कामासाठी इतरत्र लागणाऱ्या तरुणींची विक्री करण्याचा व्यवसाय करायचे. ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. त्यातून दोन्ही प्रकरण समोर आली. सध्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील गोल्डी उर्फ अमन गणवीर, सुरज तिवारी, इमरान हे चार आरोपी फरार आहेत.

महिला, तरुणींचा वापर

अभिषेक पांडे कॅटरिंग आणि इव्हेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गांजासह इतर अंमली पदार्थ्याची तस्करी ओडिशासह देशातील इतर भागात करायचे. त्यासाठी ते शहरातील महिलांना कॅटरिंग आणि तरुणींना इव्हेंटसाठी न्यायचे. तरुणींच्या बॅगमध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ भरण्यात येत असे, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपींवर गुन्हे दाखल

प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी विक्की भोसले यासह सचिन इंगळे याचावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय शाल उर्फ दत्तू खाटीक याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६ आरोपी अटक करण्यात आले असले तरी, अजून प्रकरणात फरार आणि सहभागी काही आरोपींच्या मागावर पोलिस असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com