Nagpur Crime News : भाजी कापण्याच्या चाकूने सासूवर सपासप वार

प्रतापनगरात सुनेच्या कृत्याने उडाली खळबळ
nagpur crime news
nagpur crime news sakal

नागपूर - मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या सुनेने भाजी कापण्याच्या चाकूने ८० वर्षीय सासूच्या गळ्यावर सपासप वार करीत खून केला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागोबा मंदिराजवळील गुडधे लेआऊट परिसरात उघडकीस आली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.

पुनम आनंद शिखरवार (वय ३८) असे आरोपी सुनेचे नाव असून तारादेवी ब्रिजलाल शिखरवार (वय ८०) असे मृत सासूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम आणि आनंद शिखरवार यांचे २००६ साली लग्न झाले. आनंद याने घरासमोरच एक रुम तयार करीत, तिथे दुचाकी दुरुस्तीचे दुकान सुरू केले आहे.

nagpur crime news
Akola agriculture : पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून आनंदची पत्नी ही मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यावर उपचार सुरू असून ती नियमित गोळ्या खायची. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तिने गोळ्या खाणे बंद केले.

त्यामुळे ती सातत्याने उद्विग्न व्हायची. याशिवाय कुणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून हातात येणारी वस्तू भिरकवून देत असे. दरम्यान शनिवारी सांयकाळी त्या स्वयंपाक करीत असताना, अचानक हातात भाजी कापण्याचा चाकू घेऊन ती हॉलमध्ये आली.

nagpur crime news
N D Mahanor: अलविदा, रानकवी..! हेमांगी कवी ना.धों. महानोरांच्या निधनानंतर भावुक

तिथे बसलेल्या तारादेवी यांच्या अंगावर धावून जात, तिने त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे सासू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. दरम्यान काही वेळात घरातून आवाज येत नसल्याने समोर दुकानात असलेला आनंद घरात गेला. त्याने हा प्रकार बघताच आरडाओरड केली.

nagpur crime news
Akola news : प्रभारी अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस हजर

शेजारी गोळा झाले. यापैकी एकाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकलला पाठवला. पोलिसांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल करीत, अटक केली असून तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com