Nagpur News : ऑनलाइन गेमिंगद्वारे ५८ कोटींनी फसवणूक

१७ कोटींची रोख, १४ किलो सोने, २०० किलो चांदी जप्त; पोलिसांचा गोंदियात छापा
online gaming
online gamingsakal

नागपूर : ऑनलाइन गेमिंमद्वारे तांदळाच्या व्यापाऱ्याची बुकीने तब्बल ५८ कोटी ४२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी बुकीविरुद्ध फसवणुकीसह खंडणी आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे पोलिसांनी बुकीच्या गोंदिया येथील घरावर छापा टाकून आतापर्यंत घरातून १७ कोटी रुपये रोख आणि १४ किलो सोने व २०० किलो चांदी जप्त केली आहे online gaming 58 crore fraud rice merchant

अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन (वय ४०, रा.गोंदिया) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार असलेला नागपुरातील व्यापारी आधी गोंदियात राहायचा. त्यानंतर त्याने नागपुरात स्थायिक होत एक्सपोर्ट आणि ब्रोकिंगचे काम सुरू केले. यादरम्यान तो अमित गोविंदप्रसाद अग्रवाल, रिंकू, अजित आणि प्रकाश गुलाबचंद अग्रवाल यांच्या संपर्कात आला. दरम्यान गोंदियात असताना, अनंत त्याचा भागीदार होता.

online gaming
Nagpur Rain Update : नागपुरातील शेकडो वस्त्यांसह दीडशेवर गावांना पुराचा धोका; राज्यात अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये अनंतने त्यांच्याशी संपर्क केला. त्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची बतावणी केली. अगोदर व्यापाऱ्याने त्यास नकार दिला. मात्र, त्याने जबरदस्ती केल्यावर ‘डायमंड एक्सचेंज डॉट कॉम’ या लिंक पाठवित त्याचे लॉगिन आणि पासवर्ड तयार करून देत ऑनलाइन बेटिंग सुरू केले. सुरुवातीला व्यापाऱ्याने आठ लाख रुपये हवाला व्यापाऱ्याच्या माध्यमातून अनंतला पोहोचविले.

खात्यात आठ लाख रुपये जमा झाल्याचे व्यापाऱ्याला दिसले. त्यानंतर व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला व्यापारी जिंकला. त्यानंतर तब्बल ५८ कोटी रुपये हरला. अनंत हा सतत जिंकत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला. त्याने त्याला पैसे परत मागितले. अनंतने पैसे देण्यास नकार दिला. याशिवाय त्याला कुठे वाच्यता केल्यास अपहरण करून मारण्याचीही धमकी दिली. त्यातून त्याने उर्वरित चाळीस लाखही अनंतला दिले.

online gaming
Nagpur : सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीचा घाट; बेरोजगारीत वाढ?

व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार केली. सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अनंतच्या गोंदियातील घरी छापा टाकून कोट्यवधीची रोख व चार किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. अनंत हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती शनिवारी (ता.२२) दुपारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्यांनी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तानी केले आहे.

अशी करायचा फसवणूक

ऑनलाइन गेमिंगदरम्यान अनंत सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून ॲप सेट करीत, त्यातून बेटिंगमध्ये व्यापारी जिंकण्याच्या स्थितीत असताना, त्याच्या लॉगिनमध्ये एरर निर्माण करायचा. याशिवाय त्याच्या पॉईन्ट्समध्येही असेच एरर दाखवून त्याचा गेम बंद करायचा. सातत्याने असे होत असल्यानेच ही बाब मुद्दाम करण्यात येत असल्याचे लक्षात येताच, त्यांना फसवणूक झाल्याचे आढळले. त्यातून त्यांनी तक्रार केली.

online gaming
Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयावरून हातोड्याने पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाजवळ झोपला

गेमिंगमध्ये ७७ कोटींवर खर्च केले

व्यापाऱ्याने ऑनलाइन खेळण्याच्या नादात गेमिंगमध्ये जवळपास ७७ कोटी रुपये गुंतविले होते. त्यापैकी त्याला १९ कोटी परत मिळाले. मात्र, उर्वरित ५८ कोटी ४२ लाख परत मिळाले नाही.

अनंत जैन दुबईत फरार

अनंत जैन याने ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती आहे. तो देशात अशाप्रकारे गेमिंगच्या माध्यमातून फसवणुकीचा मास्टरमाईन्ड असून दुबईतून हे सर्व कामे तो करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शुक्रवारी सकाळीच अनंत जैन हा दुबईला निघून गेल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान नागपूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्याच्या घरावर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोख व सोने जप्त केले. ही रक्कम अधिक वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com