वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार

शहरात महिलांवरील अत्याचारात वाढ; पाेलिसांनी द्यावे लक्ष
nagpur crime update old man Sexually abuse minor girl
nagpur crime update old man Sexually abuse minor girlSakal

नागपूर : कुलर दुरुस्तीसाठी आलेल्या वृद्धाने मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. ही संतापदायक आणि समाजमन सुन्न करणारी अतिशय गंभीर अशी घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी विरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. देवदास (६०) असे आरोपी वृद्धाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे चिमुकलीची आई आणि आजी दोघीही कामाला गेल्या होत्या. चिमुकली घरी एकटीच होती. दुपारी १२ ते १२.५० दरम्यान आरोपी देवदास चिमुकलीच्या घरी आला. मुलगी घरात खेळत होती, तर तिच्या मामाचा मुलगा बाहेर खेळत होता. चिमुकली घरी एकटीच असल्याचे पाहून देवदासच्या मनात सैतान संचारला. त्याने पीडितेला जवळ बोलावून तिच्याशी लैंगिक अत्याचार केला.

तिच्या रडण्याचा आवाज ऐकून मामाचा मुलगा घरात आला असता आरोपी देवदास आक्षेपार्ह स्थितीत दिसला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने देवदासने तेथून पळ काढला. सायंकाळी आई आणि आजी घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार सांगितला. आईने पोलिस ठाणे गाठून देवदास विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदवून देवदासला अटक केली.

रागातून सोडले घर, रस्त्यात विनयभंग

वडिलांनी रागावल्यामुळे नाराज होऊन एक १७ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. मध्यरात्रीला रस्त्याने भटकताना एका तरुणाशी धक्का लागल्यावरून वाद झाला. या दरम्यान आरोपी तरुणाने तिच्याशी अश्‍लील चाळे केले आणि फरार झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे. आरोपीचे वय अंदाजे २० असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. पीडित मुलगी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वडिलांनी तिला जेवण मागितले. पीडितेने स्वयंपाकाला उशीर असल्याचे वडिलांना सांगितले. यावरून वडील तिच्यावर रागावले. यामुळे नाराज होऊन पीडितेने घर सोडले. रात्री उशिरापर्यंत ती रस्त्यावर भटकत राहिली. राग शांत झाल्यानंतर रात्री १.४५ च्या सुमारास ती पायदळ आपल्या घराकडे निघाली. रस्त्यात आरोपी तरुणाला तिचा धक्का लागला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन भांडण झाले. या दरम्यान आरोपीने शिवीगाळ करीत तिच्याशी अश्लील चाळे केले आणि फरार झाला. पीडितेने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com