
नागपूर : लुटपाट करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी भांडेवाडी परिसरातील प्रजापतीनगराजवळील निर्माणाधीन इमारतीच्या सुरक्षा रक्षकावर चाकूने वार करीत खून केला. याशिवाय पिझ्झा डिलिव्हरी बॉयलाही लुटले. घटना बुधवारी (ता.१६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.