Crime News: गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या रिक्षाचालकावर मुलीच्या जुन्या मित्राचा चाकू हल्ला

Crime News
Crime News sakal

नागपूर: मैत्रिणीसोबत फिरणाऱ्या युवकावर तिच्या जुन्या मित्राने चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.६) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रबुद्धनगरात उघडकीस आली.

अनिल राकेश यादव (रा. म्हाडा क्वार्टर) असे आरोपीचे नाव असून रोहित उर्फ बजरंग सुनील वाघ (वय २८, रा. म्हाडा कॉलोनी, बिल्डिग न. ७९, कपिलनगर) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा ऑटो रिक्षाचालक आहे. मागील सहा महिन्यापासून घराजवळ कॉलनी मागे राहणारी

Crime News
काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना अटक; कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

मैत्रिणीसोबत फिरल्याने युवकावर चाकूने हल्ला

वर्षा गणेश केवट (वय ३२) यांच्यासोबत मैत्री आहे. वर्षाच्या नवीन घराचे बांधकाम प्रबुद्ध नगर, विटा भट्टी रोड, कपिलनगर येथे सुरू असल्याने रोहित आणि वर्षा ते बघण्यासाठी नेहमी एकत्र जायचे. ही बाब अनिलला माहिती पडली.

Crime News
Nagpur: हृदयद्रावक! खेळताना १५ वर्षीय गतिमंद मुलाचा गळफास लागून मृत्यू

त्याने रोहितला तिच्यासोबत का फिरतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवारी दोघेही प्लॉटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असताना, रात्री साडेनऊच्या आसपास अनिलने रोहित आणि वर्षाला तीन मित्रांसह गाठले. यावेळी त्याच्या हातात चाकू असल्याने दोघेही तिथून पळू लागले.

मात्र, अंगावर धावून येत रोहितच्या बोटांवर व डोक्यावर चाकू मारुन गंभीर जखमी केले. त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com