

A retired railway employee in Nagpur lost ₹32.82 lakh in a cyber fraud linked to a fake UMID medical card update.
esakal
नागपूर : रेल्वे अधिकारी असल्याची बतावणी करून उमेद मेडिकल कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची ३२.८२ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय तक्रारदार हे रेल्वे विभागाचे निवृत्त सहाय्यक कार्य अधिकारी आहेत. २ नोव्हेंबरला सकाळी त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण डीआरएम कार्यालयातून हेमराज एपीओ बोलत असल्याचे सांगितले.