Nagpur Rain: मेघ बरसले, शहर गारठले; उपराजधानी बनलीय हिलस्टेशन
Weather Update: ‘मोंथा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नागपूरमध्ये दहा तास संततधार पावसाने हजेरी लावली. गारवा, धुकं आणि थंड वातावरणामुळे शहराला ‘हिलस्टेशन’चा अनुभव मिळाला. शहरात बुधवारच्या मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत जवळपास दहा तास संततधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
नागपूर : बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळाने अपेक्षेप्रमाणे उपराजधानीला जोरदार दणका दिला. शहरात बुधवारच्या मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत जवळपास दहा तास संततधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.