Dhanlaxmi Women’s Cooperative Credit Society in Gokulpeth, Nagpur, where an alleged ₹54.20 lakh deposit misappropriation came to light.
esakal
नागपूर,: ठेवीदारांकडून मुदत ठेवींची रक्कम घेऊन पावत्या दिल्या; मात्र ती संस्थेच्या दप्तरी न नोंदवता ५४ लाख २० हजार रुपयांचा अपहार केला. हा प्रकार गोकुळपेठ कॉफी हाऊस चौक येथील धनलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षा रूपाली मोरे यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.