Nagpur RailwaySakal
नागपूर
Nagpur Railway : नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेत लावणार सीसीटीव्ही; कॅमेरा फुटेजचे ‘एआय’कडून विश्लेषण, प्रवाशांना मिळणार सुरक्षा
CCTV In Trains : नागपूर, बिलासपूर आणि रायपूर रेल्वे विभागातील १०५२ डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
नागपूर : धावत्या रेल्वेत चोरट्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह बिलासपूर आणि रायपूर विभागात धावणाऱ्या तब्बल १०५२ डब्ब्यात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

