

Nagpur News
sakal
नागपूर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि खरेदीचा उत्सव. जिल्ह्यातील बाजारपेठांनी यंदा विक्रमी उलाढाल करत नवा इतिहास रचला. जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक बाजारात एकूण तब्बल ४५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यापार संघटनांनी व्यक्त केला आहे. यंदा ग्राहकांचा उत्साह आणि जीएसटी दरात झालेली कपात या तिन्ही घटकांनी बाजारात अभूतपूर्व चैतन्याचा झगमगाट केला.