Diwali Firecracker : फटाके फोडण्यापूर्वी नियम जाणून घ्या; नागपूर पोलिस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश

Nagpur Diwali Firecracker Ban: नागपूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी फटाके फोडण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ६ ते १४ नोव्हेंबरदरम्यान सार्वजनिक रस्ते, पेट्रोल पंप, रुग्णालये आणि शाळांच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
Nagpur Police announce Diwali firecracker restrictions to ensure public safety and control pollution.

Nagpur Police announce Diwali firecracker restrictions to ensure public safety and control pollution.

esakal

Updated on: 

नागपूर,: दिवाळीचा जल्लोष करताना रस्त्यावर फटाके फोडण्याचा विचार असेल, तर जरा थांबा. सार्वजनिक रस्त्यांपासून पेट्रोल पंप, रुग्णालये आणि शाळांच्या परिसरापर्यंत फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १४ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

Loading content, please wait...