esakal | नागपूर दूरदर्शन केंद्र झाले बंद
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपूर दूरदर्शन केंद्र झाले बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दूरदर्शनच्या नागपूर केंद्राच्या टेरेस्ट्रियल बँड ३ वाहिनी क्रमांक सातवरचे डीडी सह्याद्रीचे प्रक्षेपण ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. मात्र या वाहिन्या दूरदर्शन डीडी फ्री डिश डीटीएच सेवेवर उपलब्ध राहणार आहेत.

प्रसार भारती मंडळ तसेच दूरदर्शन महासंचालनालयाच्या आदेशानुसार क्षेत्रीय प्रक्षेपण सेवा बंद करण्यात आल्याचे नागपूर दूरदर्शन केंद्राचे अभियांत्रिकी उपसंचालक भूपेंद्र तुरकर यांनी कळविले आहे. एकेकाळी टीव्हीवर दूरदर्शन हेच एकमेव मनोरंजनाचे माध्यम होते. दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या रामायण, महाभारत सारख्या मालिकांमुळे सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या होत्या. दूरदर्शन ते घरोधरी पोहचले होते. त्यानंतर अनेक खासगी वाहिन्यांचा या क्षेत्रात प्रवेश झाला. चोवीस तास मनोरंजनाचे कार्यक्रम आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सादर केल्या जाणाऱ्या मालिकांमुळे दूरदर्शनला प्रेक्षकांची आहोटी लागली होती. त्यात क्षेत्रीय वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांना दर्शकही लाभत नव्हते.

loading image
go to top