Nagpur Drought: बंदी हटवल्यावर पहिलाच बोअरवेल, ; दुष्काळात तोही झाला फेल! विहिरीसाठी अनुदान; बोअरवेलसाठी का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

Borewell Ban Lifted, But Drought-hit Farmer Finds No Water in Nagpur : लोहारी सावंगा येथील शेतकऱ्याने १,८०० मोसंबीची झाडे वाचवण्यासाठी हजार फुटांपर्यंत बोअरवेल केली; मात्र १.८० लाख रुपये खर्चूनही पाणी लागले नाही.
Farmer Gajanan Chaple stands in his mosambi orchard as water scarcity threatens his 1,800 trees in Lohari Sawanga.

Farmer Gajanan Chaple stands in his mosambi orchard as water scarcity threatens his 1,800 trees in Lohari Sawanga.

esakal

Updated on: 

नागपूर : ‘‘मुख्यमंत्री दिवाळीत आमच्या गावात राह्यले. आमची व्यथा ऐकून घेतली. बोअरवेलवरील बंदी हटवली. माझ्या शेतातील अठराशे मोसंबीची झाडे वाचविण्यासाठी मी बोअरवेल केला. हजार फुटापर्यंत हिंमत केली. बोल्डरमध्ये पाणीच नव्हते. घरचीच्या आंगावरचं सोनं विकलं. एक लाख अंशी हजार लावले. सारे पैसे पाण्यात गेले.’’

लोहारी सावंगा येथील शेतकरी गजानन धनराज चापले निराशपणे सांगत होते. १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल करण्याची मुभा मुख्यमंत्र्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन काढले. गजाननराव यांनी त्यांच्या शेतात रविवारी बोअरवेल केला. बंदी हटविल्यानंतरचा तो महाराष्ट्रातील पहिलाच बोअरवेल होता. तो फेल गेला. आता झाडे वाचविण्याचे मोठे आव्हान गजाननरावांपुढे निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...