

Mosambi farmer Sudhakar Chaple shows drought-affected citrus trees in his orchard at Lohari Sawanga, Nagpur district.
esakal
लोहारी सावंगा, (जि. नागपूर),: ‘मोसंबीच्या बगिच्यावर गावातील ९० टक्के शेतकऱ्यांचे जगणे अवलंबून आहे. आपल्या शेतातील मोसंबीची शंभर टक्के झाडे या दुष्काळात मरणार, या भीतीने लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांची पार झोप उडाली आहे. अख्खं गाव दहशतीत आहे. मोसंबीची झाडे रोज सरणावर चढताना पाहून तीळ तीळ मरण समोर दिसत आहे.’ मोसंबी उत्पादक शेतकरी सुधाकरराव शंकरराव चापले यांनी दुष्काळाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले. मुख्यमंत्र्यांनी या गावात नुकतीच दिवाळी साजरी केली. मुक्काम केला आणि शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चाही केली.