

Nagpur News
esakal
नागपूर: शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून नागपूर महापालिकेला पर्यावरणपुरक ई-बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु, आज घडीला मनपाला उपमुख्यमंत्री निधीतून उपलब्ध झालेल्या १४० बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था नसल्याने त्यातील सुमारे ५० बसेस धुळखात उभ्या आहेत, तर काही बसेस इतर डेपोवरून चार्जिंग करून चालविण्यात येत असल्याची माहिती आहे.