
नागपूर जिल्ह्यातील काही भागांना मंगळवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू जिल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या धक्क्यांचा परिणाम जाणवला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही.