
नागपूर : नागपूर हे विमानांच्या मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ऑपरेशनचे सर्व्हिसेस हब म्हणून विकसित होत आहे. मिहानमध्ये एअर इंडिया आणि एएआर- इन्डेमार या कंपन्यांचे एमआरओ सर्व्हिस सेंटर आहे. या सेंटरमध्ये महिन्याला सरासरी २० ते २२ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम होत असल्याने नागपूरच्या विमानतळाला महत्त्व आले आहे.