Nagpur Water Crisis : भूजल पातळी घटली; पावसाचाही पत्ता नाही; शेतकऱ्यांसाठी पाणीवापर धोरणाची गरज
Nagpur Farmers Hit by Water Crisis : नागपूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात भूजल पातळी घटली असून निम्म्या तालुक्यांमध्ये पातळी कमी झाली आहे. या घटत्या पातळीमुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही धोका निर्माण झाला आहे.
नागपूर : निम्मा जून महिना उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांमध्ये यंदा मे महिन्यात भूजल पातळीत घट झाली आहे.