Monsoon Update : नागपूरमध्ये वादळी पावसाचा कहर, शहरात पाणीच पाणी; हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर!
Nagpur Weather : नागपूरमध्ये चौथ्या दिवशीही पावसाची मालिका कायम आहे, आणि गुरुवारी दुपारी व सायंकाळी विजा आणि वादळासह जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाने शनिवारपासून ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
नागपूर : उपराजधानीत पावसाची मालिका लागोपाठ चौथ्याही दिवशी कायम राहिली. गुरुवारी दुपारी तीन वाजता अर्धा तास दमदार सरी बरसल्या. त्यानंतर सायंकाळी विजा व मेघगर्जनेसह जवळपास दीड तास वादळी पावसाने झोडपले.