

Police inspect a factory allegedly involved in packaging counterfeit engine oil in Sonbanagar, Nagpur.
esakal
नागपूर : नामांकित कंपन्यांच्या नावाचा व लेबलचा गैरवापर करून बनावट इंजिन ऑईलची विक्री करणाऱ्या कारखान्यावर वाडी पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी (ता. २१) सायंकाळी खडगाव रोडवरील सोनबानगर येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत ६ लाख २१ हजार ८९० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे.