Nagpur: जादुटोना करीत महिलेवर अत्याचार; ‘बनावट’ धर्मगुरूला अटक; मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष

Fake Godman Arrested in Nagpur Assault Case: नागपुरात मुलाला माथाडी कामगार म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याच्या नावाखाली ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी बनावट धर्मगुरूला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: जादुटोनाच्या माध्यमातून ‘माथाडी कामगार’ म्हणून मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी, आध्यात्मिक उपचारक असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रामदास शिरोडे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तुकडोजी चौकात एमएसईबी कार्यालयात चौकीदार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com