Nagpur News : कर्जवाटपात बँकांच्या जाचक अटींचा खोडा; अर्धे कर्ज सावकारांनीच वाटले

पावणेदोन लाख शेतकरी सावकाराच्या दारात
farmer
farmersakal

नागपूर : बहुतांश शेतकरी पेरणीसाठी कर्ज घेतात. त्यामुळे शासनाकडूनही शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. परंतु, राष्ट्रीयकृत बॅंकांच्या अटी व कार्यपद्धतीमुळे शेतकरी सावकारांकडे जात असल्याचे दिसते.

नागपूर विभागात जून अखेरपर्यंत सावकारांनी जवळपास पावणे दोन लाख लोकांना कर्ज दिले. यातील बहुतांश हे शेतकरी असल्याची चर्चा आहे. तर याच काळात बॅंकांकडून त्यापेक्षा निम्म्याच शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले.

गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी जाहीर केली. याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला. सातबारा कोरा झाला. त्यामुळे नव्याने कर्ज मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा होती.

परंतु दरम्यानच्या काळातही शेत मालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळाला नाही. यावर्षी उत्पादन चांगले होईल व भावही चांगला राहील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कर्ज काढून शेती करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला. बॅंकांच्या दारात चपला झिजवल्यावरही कर्ज मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे काहींनी नातेवाईक तर काहींनी सावकारांच्या दारात जाणे पसंत केले.

farmer
Nagpur : 'प्रशासनाची उदासीनता भारी; पाणी आपल्या दारी', मॉन्सूनपूर्व तयारीचे पितळ उघडे, हजारो घरांत पाणी

सहकार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागात ३० जूनपर्यंत २ लाख ९२ हजार ८३८ शेतकऱ्यांना २५३८ कोटी ६ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. तर २१३९ सावकारांकडून १ लाख ७२ हजार १९८ जणांना कर्ज वाटप करण्यात आले. यात बहुतांश शेतकरी असल्याचे सांगण्यात येते. बॅंकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी सावकारांकडे जात असल्याचे चित्र आहे.

farmer
Nagpur: नागपूरच्या दोन व्यावसायिकांची कोंढाळीत गोळ्या झाडून हत्या; चार खुनांनी शहर हादरले

परवानाधारक सावकारांकडून वाटप केलेले कर्ज

जिल्हा संख्या कर्जदार संख्या वाटप रक्कम (लाखात)

नागपूर १२१७ ११३९०२ ११७९०

वर्धा १५० १०७७५ ७२८

भंडारा २९४ ५४२७ ६३१

चंद्रपूर २५४ ६६३२१८८३

गोंदिया १५३ ३३२०८ ३०२४

गडचिरोली ७१ २२५४ १६४

farmer
Nagpur : उपराजधानीत रात्रभर धुवांधार; 9 तासांत तब्बल 121 मिलिमीटर पावसाची नोंद, वीजपुरवठा खंडित, घरांत शिरले पाणी

सर्वाधिक वाटप नागपूर जिल्ह्यात

नागपूर जिल्ह्यात सावकारांकडून सर्वाधिक कर्ज देण्यात आले. जिल्ह्यात १२१७ परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्याकडून १ लाख १३ हजार ९०२ जणांना १११ कोटी ७५ लाखांचे कर्ज देण्यात आले. याच काळात नागपूर जिल्ह्यात फक्त ४६ हजार ३२२ शेतकऱ्यांना ६३४ कोटी ५९ लाखांचे पीक कर्ज देण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com