

Bachchu Kadu: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन सुरु आहे. मंगळवारी सुरु झालेल्या या शेतकरी आंदोलनामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यातच बुधवारी कोर्टाने एक आदेश काढून सायंकाळी सहा वाजल्यानंतर आंदोलनस्थळ रिकामं करण्यास बजावलं होतं.
या आदेशानंतरही बच्चू कडू आपल्या आंदोलावर ठाम आहेत. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाची कॉपी आणून दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोर्टाने पेपरच्या बातमीवरुन हा आदेश काढला, पण शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांवर एकही आदेश काढला नाही, असं कडू म्हणाले.