
चेतन बेले
नागपूर : शेतीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी शेतकरी आधुनिक शेतीची कास धरू पाहत आहेत. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातून १३ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी नोंदणी केली. सव्वा पाच हजार शेतकऱ्यांनी चाचणीसाठी माती कृषी विभागाकडे पाठविली. मात्र, पाठविलेल्यांपैकी निम्म्या नमुन्याचीही चाचणी होऊ शकली नाही. कृषी विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळेच शेतीची माती होत असल्याचे वास्तव आहे.