नागपूर : नागपूर-फेटरी-काटोल महामार्गावरील रस्त्याच्या बांधकामाला विलंब होत असून २०२१ ते एप्रिल २०२५ या कालावधीत ७९ जणांचा मृत्यू झाला आणि १६२ जण जखमी झाले. या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. या कालावधीत १५३ अपघात नोंदवले गेल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.