Nagpur News : फटाक्यांच्या ठिणग्यांनी आगीचा भडका ;शहरात ४२ ठिकाणी आगडोंब अग्निशमन दलाची धावाधाव

Nagpur Fire Incidents, 42 Fire Calls : दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे नागपुरात २४ तासांत ४२ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. देवनगरमधील दुचाकी शोरूम आणि मेडिकल चौकातील गोदामाचे मोठे नुकसान झाले.
Firefighters respond to multiple fire incidents across Nagpur during Diwali, with 42 emergency calls recorded within 24 hours.

Firefighters respond to multiple fire incidents across Nagpur during Diwali, with 42 emergency calls recorded within 24 hours.

esakal

Updated on: 

नागपूर, : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे रविवारी शहरात आगडोंब उसळला. २४ तासांत शहरात ४२ ठिकाणी अग्निशमन विभागाला पाचारण करावे लागले. बहुतांश आगी कचरा आणि अन्य साहित्याने पेट घेतल्याने लागल्या.

अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार, दिवाळीच्या दिवशी रविवारी (ता. ८) सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत आगीच्या पाच घटनांची नोंद झाली. त्यानंतर रात्री ८ ते मध्यरात्री १२ या अवघ्या चार तासांत सर्वाधिक २४ कॉल आले. मध्यरात्री १२ ते सोमवार (ता. ९) रोजी सकाळी ८ या वेळेत आणखी १३ कॉल आले.

Loading content, please wait...