Nagpur News : नागपूरच्या महाल परिसरातील राजकमल इमारतीत इलेक्ट्रिक दुकानाच्या गोदामाला आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे लागलेल्या आगीत दुकान मालक व एक कर्मचारी होरपळले; तिसरा गंभीर जखमी.
नागपूर : महाल येथील गांधी गेट परिसरातील राजकमल इमारतीमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानाच्या गोदामात शनिवारी लागलेल्या आगीत होरपळून दुकान मालकासह दोघांचा मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.