

Passengers face soaring airfares as flights from Nagpur to major cities fill up after the Diwali holidays.
esakal
नागपूर : दिवाळीसाठी शहरात आलेल्यांना आता कर्मभूमीत परतण्यासाठी विमानांच्या महागड्या तिकीट दराचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागपूरहून देशातील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या बहुतांश विमानांची तिकिटे फुल झालेली आहेत. शुक्रवार ते रविवार या कालावधीत विमानांची उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे ज्या विमानांमध्ये मोजक्या जागा शिल्लक आहेत त्यांचे भाडे गगनाला भिडले आहे.