Nagpur Flood : वीज-पावसाचे तांडव दहशतीत जागून काढली रात्र, क्षणाक्षणाला उडाला थरकाप

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने डागा लेआऊट, कार्पोरेशन कॉलनीमधील चारचाकी, दुचाकी दोनशे मिटरपर्यंत वाहून गेल्या
nagpur
nagpursakal

१५०० दुकानांचे नुकसान गोठ्यातच , दगावली जनावरे ,गणेश मूर्तीही वाहून गेली

रस्ता, वाहने वाहून गेली , लष्करासह एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत

बोटीचा वापर करून वाचविले चारशे लोकांना ,नाग नदी, पिवळी नदीचे पाणी वस्त्यात शिरले , नागरिकांचे रात्रभर जागरण , धान्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे नुकसान

अनेक रस्ते बंद, वाहतूक कोंडी , गणेशोत्सव, महालक्ष्मीच्या उत्साहावर विरजण

नागपूर - मध्यरात्रीनंतर शनिवारी सकाळपर्यंत चार तासांत झालेल्या पावसाने वस्त्या, झोपडपट्ट्या जलमय झाल्या असून नागरिकांत हाहाकार माजला आहे. या पावसामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून १४ जनावरांचाही जीव गेला. काही तासांच्या पावसांत नागपूरकरांचे जीवन विस्कळीत झालेच, शिवाय अनेकांचे संसारही अस्तव्यस्त झाले. अनेक वस्त्यातील नागरिक मदतीसाठी याचना करताना दिसून आले. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने काही काळासाठी रस्ते बंद करण्यात आले.

घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यासह इलेक्ट्रिक साहित्याची नासधूस झाली. लष्करासह एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमनच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने चारशेवर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. महापालिकेच्या वतीने या नागरिकांना पाणी व नाश्त्याचे साहित्य देण्यात आले.

nagpur
Nagpur Floods: फक्त १ तासाचा पाऊस अन् होत्याचं नव्हतं झालं...नाग'पूर' जलप्रलय पाहा photo

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने डागा लेआऊट, कार्पोरेशन कॉलनीमधील चारचाकी, दुचाकी दोनशे मिटरपर्यंत वाहून गेल्या. या अंबाझरी तलाव मार्गासह नरेंद्रनगर, मनीषनगर, लोहापूल आरयूबीखाली पाणी जमा झाल्याने हे मार्गही बंद करण्यात आले. मध्यवर्ती रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक, मोरभवन बसस्थानक व काही मेट्रो स्टेशनमध्येही पाणी शिरले.

nagpur
Nagpur Floods: नागपुरकरांवर कोपला वरुणराजा अन् मुंबईकरांना आठवला २६ जुलैचा पाऊस!

पंचशील, झाशी राणी चौकातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने हाही रस्ता बंद झाल्याने नागपूरकरांची चांगलीच कोंडी झाली. पावसाच्या रौद्ररुपामुळे नागपूरकरांच्या गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवावरही विरजन पडले.

पावसाचा शहराच्या प्रत्येकच भागाला तसेच प्रत्येक नागरिकाला तडाखा बसला. घरात तरंगणाऱ्या भांड्यापासून तर वाहून जाणाऱ्या चारचाकीचे दृश्य शहराच्या विविध भागांमध्ये दिसून आले. पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील ७० वर्षीय मिराबाई पिल्ले आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील ८० वर्षीय संध्या डोरे यांचा मृत्यू झाला.

हजारीपहाड भागात नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने बांधलेली चौदा जनावरे मृत पावली. यात सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरांचा समावेश आहे. शहरातील सर्वच इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. त्यामुळे अनेकांची वाहने पाण्याखाली आली. परिणामी नागरिकांचे बाहेर जाणेही कठीण झाले. अनेक दुकाने, आस्थापना, शासकीय कार्यालये, पेट्रोल पंपही जलमय झाले.

nagpur
Nagpur Flood Video : मध्यरात्री ढगफुटी, पोलिसांना पहाटेचा फोन अन्...; पुरातून वाचवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी साचले. अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्याने समता लेआऊट, डागा लेआऊट पाण्याखाली आले होते.येथे लष्करासह एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमनच्या जवानांनी बोटीच्या मदतीने येथील चिमुकल्यांना प्राधान्याने बाहेर काढले. त्यानंतर इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या जवानांनी काही लोकांना औषध व पाणीही नेऊन दिले. अनेक शाळांमध्ये पाणी साचल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली. अनेक वस्तिगृहातही पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांनी शहर सोडून गावची वाट धरली.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आढावा घेतला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काही वस्त्यांना प्रत्यक्ष भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com