

Nagpur News
esakal
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या आणि स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहरात मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी राहिलेलेच नाही. त्याऐवजी तिथे बांधकाम साहित्याचा ढिगारा, दुचाकी-चारचाकी वाहनांचे पार्किंग आणि खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचा विळखा आहे. अतिक्रमण काढण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट आदेश देऊनही प्रशासन ढिम्म असल्याने नागरिकांनी चालायचे कुठे, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.