Ajit Pawar Baramati Sabha
Ajit Pawar Baramati SabhaSakal

Nagpur: सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच, नागपूरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
Published on

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा शनिवारी दुपारी तीन वाजता सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार चाळीस आमदार घेऊन सत्तेस सहभागी झाल्यानंतर प्रथमच नागपूर जिल्ह्यात मेळावा घेण्यात येत आहे.

Ajit Pawar Baramati Sabha
Nagpur News : गर्भनिरोधक साधने कुचकामी ठरल्याने हजारांवर गर्भपात!

राष्ट्रवादीच्यावतीने शहराध्यक्षपदी प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्षपदी बाबा गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात होणारी गर्दी आणि उपस्थिती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar Baramati Sabha
Mumbai News : ताज हॉटेलवर हल्ल्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

विदर्भात राष्ट्रवादीला सक्रिय करण्याची जबाबदारी प्रफुल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या मेळाव्यापासून अजित पवार गटाच्या कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. त्यानंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com