नागपूर भविष्यातील ‘स्टार्टअप हब’

इंन्क्यूबिटर सेंटरचे सीईओ प्रताप शुक्ला यांचे मत; ‘सकाळ संवाद’मध्ये गप्पा
नागपूर भविष्यातील ‘स्टार्टअप हब’
नागपूर भविष्यातील ‘स्टार्टअप हब’

नागपूर : नागपूर शहर देशाच्या मध्यभागी वसलेले शहर आहे. शिवाय, शहरातील लोक प्रत्येक गोष्टीसाठी उत्साही असतात. आप-आपसातील नातेसंबंध उत्कृष्टपणे जोपासणाऱ्या या समाजामध्ये ‘स्टार्टअप’ संकल्पना रुजण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे, भविष्यामध्ये नागपूर हे नक्कीच ‘स्टार्टअप हब’ होऊ शकते, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंन्क्यूबिटर सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप शुक्ला यांनी व्यक्त केले.

यावेळी इंन्क्यूबिटर सेंटरचे मेंटॉर योगिता कस्तुरे, मनोज चव्हाण यावेळी उपस्थित होते. स्टार्टअप संकल्पनेला व्यापक स्वरूप, बळकटी मिळावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे इंन्क्यूबिटर सेंटर सुरु करण्यात आले आहे. ‘दै. सकाळ’च्या कार्यालयामध्ये उपस्थित राहत त्याविषयी विस्तृत आणि मनमोकळा संवाद सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मेंटॉर यांनी साधला.

नागपूर भविष्यातील ‘स्टार्टअप हब’

योगिता कस्तुरे म्हणाल्या, स्टार्टअपची सुरवात आपल्या परिसरातील समस्येला ओळखून व्हायला हवी. अशा समस्यांचा आपल्याला शोध घेता यायला हवा. तसेच, पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क याबाबत जागरूक राहायला हवे. पैसा लागतो म्हणून ही गोष्ट निर्मात्यांकडून टाळली जाते. मात्र, भविष्यामध्ये मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. मनोज चव्हाण म्हणाले, आपले उत्पादन मोजक्या निर्मिती खर्चामध्ये बसविणे हे निर्मात्यापुढील आव्हान असते. तंत्रज्ञानाचा वापर करीत तयार केलेल्या कल्पक उत्पादनाचा खर्च जास्त असतो. तंत्रज्ञानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने स्टार्टअप संकल्पना प्रत्यक्षात उतरलीच तर पुढील सहा महिन्यात हे तंत्रज्ञान बाजारामध्ये टिकेलच, असे नाही. तंत्रज्ञान आणि ॲप्लिकेशनवर भर देण्यापेक्षा समाजामध्ये बदल घडवून आणेल, अशा संकल्पनांवर भर द्यायला हवा.

इंन्क्यूबिटर सेंटरमध्ये काय मिळेल?

  • स्टार्टअप संकल्पनेचा विस्तार करता येईल

  • तथ्य कळतील

  • तांत्रिक प्रक्रियेची माहिती मिळेल

  • नेटवर्क उपलब्ध होइल

  • वित्तीय साहाय्य मिळण्याचीही शक्यता

  • स्टार्टअपसाठी हे महत्त्वाचे

  • परिसरातील समस्या लक्षात घ्या

  • छोट्या गोष्टींपासूनच सुरवात करा

  • उत्पादन कोणत्या गटासाठी उपयोगी ठरेल याचा शोध घ्या

  • इतर यशस्वी स्टार्टअप प्रक्रियेचा अभ्यास करा

  • उत्पादन दोन वर्षे टिकेल का, याचा विचार करा

  • लोकसहभाग महत्त्वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com