जी- २० ची बैठक मार्चमध्ये नागपूरमध्ये ! केंद्राच्या पथकाने केली पाहणी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G20 summit

जी- २० ची बैठक मार्चमध्ये नागपूरमध्ये ! केंद्राच्या पथकाने केली पाहणी..

नागपूर : जागतिक पातळीवरील जी-२० देशाचे पुढील वर्षभरासाठी अध्यक्षता भारत करणार आहे. देशातील विविध २०० शहरात या बैठका होणार आहेत. त्यातील एक बैठक मार्च महिन्यात नागपूरला होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या पथकाने काही स्थळांची पाहणीही केलेली आहे.

हेही वाचा: Nagpur Railway station : कुत्रे आणि प्रवासी एकाच प्रतीक्षालयात

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था व व्यापाराबाबत यात चर्चा होते. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी-२० चे अध्यक्षता भारत करणार आहे. या काळात देशात अनेक बैठका होतील. त्यामुळे यासाठी देशभारातील विविध शहरांची माहिती केंद्राकडून घेण्यात येत आहे. यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, हैद्राबाद, बंग्लोर, जयपूर, अहमदाबाद, भोपाल, गुवाहाटी आदी शहरांचा समावेश आहे. नागपूर शहरही केंद्राच्या विचाराधीन असल्याचे दिसते. केंद्राचे एक पथक काही दिवसांपूर्वी नागपूरला येऊन गेले. तब्बत चार दिवस ते येथे डेरेदाखल होते. या पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा: Nagpur: फडणवीसांच्या नागपूरमध्येच भाजपला धक्का; 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे

जी-२० देशातील शेकडो अधिकारी यानिमित्त शहरात दाखल होतील. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था, बैठकीच्या ठिकाणाबाबत चाचपणी करून विमानतळ प्राधिकरणासोबतही पथकाने चर्चा तसेच सुरक्षेबाबत आढावा घेतला. पथकाने अहवाल केंद्र सरकारला सादर केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. वातावरण बघता मार्च महिन्यात बैठक होण्याची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा: Nagpur : राज्याचे नवे खनिकर्म धोरण : फडणवीस

शहरातील हॉटेलसह पर्यटन स्‍थळाची पाहणी

शहरातील चार, पाच हॉटेलसह शहराबाहेरील एका हॉटेलची माहिती केंद्रीय पथकाने घेतली. विरंगुळा म्हणून छायाचित्रकार रुडयार्ड कपलिंग यांच्या जंगल बुकमधील ‘मोगली‘ कॅरेटरमुळे जगप्रसिद्ध झालेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पालाही भेट देणार असल्याने त्यांचीही माहिती घेतली.इतरही काही पर्यटन क्षेत्रांची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.