
Gadchiroli Murder Case Solved by Police: कोणताही दुवा न सोडता अतिशय शिताफीने झालेल्या हत्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी कौशल्याने तपास करून अखेर अटक केली आहे. विकास जनार्दन बोरकर (वय ५०) रा. कुरूड ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे, तर प्रदीप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (वय ३०) रा. कुरूड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे मृताचे नाव आहे.
अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृत प्रदीप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार याच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोपीने कोणत्याही स्वरूपाचा पुरावा नसल्याने गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणात एक तपास पथक नियुक्त करण्यात आले. (Latest Marathi News)
८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री १० ते १०.३० वाजता दरम्यान मृताने आरोपीस अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने आरोपी विकास बोरकरने प्रदीप घोडेस्वारच्या डोक्यात सिमेंटच्या कवेलूने मारून गंभीर जखमी करून खून केल्याची माहिती समोर आली.
आरोपीसोबत भांडण
पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात असे लक्षात आले की, मोलमजुरी करणारा आरोपी विकास बोरकर याची पत्नी व मुलीकडे मृतक वाईट नजरेने बघायचा व त्यांना त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मृत व आरोपी यांच्यात नेहमी भांडण होत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.