Gadchiroli: दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक, राज्य सरकारकडून साडे पाच लाखांचे होते बक्षीस; एक जनमिलिशियाही ताब्यात

सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांना व टिटोळा गावच्या पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशियास गडचिरोली पोलिस दलाने रविवार (ता. ७) अटक केली.
Gadchiroli
Gadchiroli Esakal

Gadchiroli Two Extremist Female Maoist Commander Arrested: सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांना व टिटोळा गावच्या पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशियास गडचिरोली पोलिस दलाने रविवार (ता. ७) अटक केली. या दोन जहाल महिला माओवाद्यांवर सरकारने साडे पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी काजल ऊर्फ सिंधू गावडे,(वय २८) रा. कचलेर. ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१) रा. रामनटोला, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या दोघी गडचिरोली-कांकेर (छत्तीसगड) सीमेवरील पिपली बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील जवेली जंगल परीसरात संशयितरित्या फिरत आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पिपली बुर्गी पोलिस स्टेशन पथकाचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -१९२ बटालियनच्या जवानांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपासात असे दिसून आले की, २०२० साली कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस - माओवादी चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते.(Latest Marathi News)

या चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या चकमकीच्या अनुषंगाने भामरागड पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पिसा पांडू नरोटेचे गुन्हे

२०१८ पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षीत ठिकाणी ठेवणे, निरपराध व्यक्तींचे खून करण्याआधी रेकी करून त्याची माहिती माओवाद्यांना पुरविणे, पोलिस पथकाबद्दल माहिती देणे तसेच माओवाद्यांची पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम करत होता. २०२१ पासून जनमिलिशीया कमांडर म्हणून काम करत होता. २०२२ मध्ये झारेवाडा येथील निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२२ मध्ये गोरगुट्टा येथील निरपराध व्यक्तीच्या खुनात व २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या टिटोळा पोलिस पाटलाच्या हत्येमध्येअशा तीन खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

Gadchiroli
Share Market Today: शेअर बाजारातील अस्थिरतेत 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

काजल ऊर्फ सिंधू गावडेने केलेले गुन्हे...

काजल २०१२ मध्ये प्लाटून क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन २०२० पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. २०२० पासून डीव्हीसी (डिव्हीजनल कमिटी) स्टाफ टीम/प्रेस टीममध्ये सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती.

२०१९ मध्ये नारकसा जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये दराची सिंदेसुर जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये बोधीनटोला जंगल परीसरातील चकमक, २०२०मध्ये किसनेली पहाडी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये फुलकोडो जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये खोब्राामेंढा जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये मोरचूल जंगल परिसरातील चकमक अशा ७ चकमकीत तिचा सहभाग होता. (Latest Marathi News)

गीता ऊर्फ सुकली कोरचाने केलेले गुन्हे

गीता २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीयामध्ये बदली होऊन सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती.

२०१९ मध्ये मोरोमेट्टा – नेलगुंडा जंगल परीसरात पोलिसांसोबत झालेली चकमक, २०२०मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये कोपर्शी जंगल परिसरातील चकमक अशा तीन चकमकीत तिचा सहभाग होता. तसेच २०२० मध्ये कोठी येथे झालेल्या एका पोलिस जवानाच्या हत्येमध्ये तसेच २०२१ मध्ये कोठी ते भामरागड रोडवर झालेल्या एका निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये तिचा सहभाग होता.

Gadchiroli
Madha Lok Sabha Election: माढा लोकसभेचा तिढा सुटेना; मविआकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरूच; अनिकेत देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com