

Police Restrictions on DJ Use:
esakal
नागपूर: गणरायाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नागपूर पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तांनी डीजेवर निर्बंध घातले असून, त्यानुसार आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर टाळण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.