

Nagpur News
esakal
नागपूर: घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनाबाबत होणाऱ्या तक्रारी आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता सिलिंडर पुरवठा करणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे प्रमाणित ‘डिजिटल पोर्टेबल वजन काटा’ असणे बंधनकारक करण्यात आले असून, ग्राहकासमोरच सिलिंडरचे वजन करून दाखवणे अनिवार्य राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.