
नागपूर : महानगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भातील अधिसूचना निघताच आजपासून महानगरपालिका मुख्यालयातील हालचालींना वेग आला आहे. इच्छुक आणि माजी नगरसेवकांची मनपा मुख्यालयात वर्दळ वाढली आहे. प्रभाग रचनेसंदर्भात मनपाच्या मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यात प्रभाग रचनेसाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीत ८ सदस्यांचा समावेश आहे.