Nagpur News : मनालीतील झिपलाइन अॅडव्हेंचर दरम्यान नागपूरची त्रिशा बिजवे केबल तुटल्यानंतर ३० फूट दरीत पडली. या अपघातात ती सुदैवाने बचावली असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
नागपूर : मनालीला उन्हाळी सुट्टीसाठी गेलेल्या एक कुटुंब झिपलाइन राईड करत असताना अचानक केबल तुटली. त्यामुळे त्यांच्या लहान मुलीचा ३० फूट खोल दरीत पडून अपघात झाला. या दुर्घटनेत मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.