Nagpur : मेडिकलमधील तब्बल ४० व्हेटिंलेटर बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Government Medical College Hospital

Nagpur : मेडिकलमधील तब्बल ४० व्हेटिंलेटर बंद

नागपूर : विदर्भासह सीमेवरील छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा येथील गरीब रुग्णांकरिता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) वरदान आहे. मात्र दुसरीकडे येथील उपचार यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती पुढे आली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णाला व्हेंटिलेटर मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. तर कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ट्रॉमा, सर्जरी, पिडियाट्रिक आदी विभागातील सुमारे ४० व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

मेडिकलमध्ये सध्या बालरोग विभाग, बधिरीकरण विभाग आणि ट्रॉमा केअर सेंटर येथे मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येथील बालरोग विभागात २० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यातील १८ व्हेंटिलेटर सुरू आहेत. केवळ २ व्हेटिलटेर बंद आहेत. शल्यचिकित्स विभागात (सर्जरी)१५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.

मेडिकलमध्ये ४० व्हेटिंलेटर बंद

येथील सर्वच सुरू आहेत. मात्र ट्रॉमा केअर सेंटर येथे एकूण किती व्हेंटिलटेर आहेत, याची माहिती नाही, मात्र १६ व्हेंटिलेटर सुरु असून ३० व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती पंकज सावरकर यांना दिलेल्या माहितीतून पुढे आली.

विशेष म्हणजे, ट्रॉमातून जनमाहिती अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या माहितीत फार तफावत असल्याचे दिसून आले. वॉर्ड क्रमांक ५१ एसआयसीयूमध्ये १७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून, त्यापैकी २ बंद आहेत. वॉर्ड २९ मध्ये १४ पैकी ६ व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

Web Title: Nagpur Government Medical College Hospital 40 Ventilators Administration Neglect

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..