साहेब, रांगेत उभे राहून मरायचे का?; रुग्णांच्या जिवाशी खेळ

कार्ड काढतानाच मरायचे का? असा सवाल असा सवाल रुग्णांसहित नातेवाइकांचा
Nagpur Government Medical huge crowd
Nagpur Government Medical huge crowdsakal

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत आहे. मात्र, यावर उपाययोजना होत नसल्यामुळे या गर्दीला आवरता येत नाही. विशेष असे की, या गर्दीतील रुग्णांनी किती वेळ रांगेत उभे राहायचे, कार्ड काढतानाच मरायचे का? असा सवाल असा सवाल रुग्णांसहित नातेवाइकांचा आहे. कार्ड काढण्यासाठीची प्रणाली ऑनलाइन झाली आहे, परंतु गर्दीमुळे तासभर उभे राहिल्यानंतरच कार्ड निघते. यानंतर उपचारासाठी किती तास बसून राहायचे, असाही सवालही रुग्णांनी केला. रुग्णांवर भोवळ येऊन पडण्याची वेळ येत आहे.

मेडिकलमध्ये सोमवारीतर प्रचंड गर्दी असते. इतर दिवशीही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गर्दी असते. सद्या कोरोना ओसरल्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. दररोज सुमारे तीन हजार रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. सद्या तर डॉक्‍टर संपावर आहेत. यामुळे निवासी डॉक्टरांच्या भरवशावर रुग्ण सेवेचा किल्ला लढवण्यात येत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना मेडिकलच्या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) ‘हाउसफुल्ल'' असतो. येथे रुग्णांना कार्ड काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. रुग्ण रांगेत बाहेर उभे असतात.

सुपरचीही हीच स्थिती

मेडिकलप्रमाणाचे सुपरमधील बाह्यरुग्ण विभागात सोमवारी न्यूरॉलॉजी, कार्डिऑलॉजी, सीव्हीटीएस, न्यूरो सर्जरी विभागाचा बाह्यरुग्ण विभाग असतो. यामुळे या दिवशी सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तोबा गर्दी उसळते. एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. डॉक्‍टरांची संख्या कमी असते. यामुळे येथे रुग्ण दिवसभर उपचाराच्या प्रतीक्षेत रुग्ण असतात. जागा नसल्यामुळे कोणी चहाटपरीवर तर कोणी बाहेरच्या पटांगणात आराम फर्मावत असतात. मात्र, बाह्यरुग्ण विभागात कार्ड काढण्यासाठी तब्बल पाचशे रुग्ण प्रतीक्षेत असतात, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.

मेडिकलमध्ये अवघे चार काऊंटर

मेडिकलमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम(एचआयएमएस ) प्रणालीअंतर्गत बाह्यरुग्ण विभाग संपूर्ण ऑनलाइन झाला आहे. मात्र एचआयएमएसच्या खिडक्यांची संख्या अवघी चार आहे. चार खिडक्यांद्वारे ३ हजार रुग्णांचे कार्ड काढणे भले मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलवण्यात येते, मात्र यासाठी रुग्णांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. यामुळे रुग्णांना उपचार वेळेत मिळत नाही, हा रुग्णांना वेठिस धरण्याचा प्रकार असल्याची तक्रार अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याकडे करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com