Nagpur Graduate Election:नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत ६४.७६ टक्के मतदान; ३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Graduate Constituency Poll : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सहा जिल्ह्यांत ६४.७६ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण ३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, नवमतदारांचा कौल आणि वर्धा जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निकालासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Graduate voters cast their ballots across six districts in the Nagpur division during the graduate constituency election.

Graduate voters cast their ballots across six districts in the Nagpur division during the graduate constituency election.

esakal

Updated on: 

नागपूर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ६४.७६ टक्के इतके मतदान झाले. विभागातील दोन लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी एक लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावला.

पदवीधरांनी एकूण ३८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद केले. त्यांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी (ता. २७) मतमोजणीनंतर होणार आहे. सर्वाधिक मतदान वर्धा जिल्ह्यात ६८.३७ टक्के झाले. या मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यात एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून मतदान सुरू झाले. प्रारंभी पदवीधरांचा निरुत्साह होता. त्यामुळेच सकाळी ८ ते १० यावेळेत केवळ ९.२० टक्के इतकेच मतदान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com