Nagpur district faces a growing groundwater crisis as water levels decline across the city and surrounding talukas.
esakal
चेतन बेले
नागपूर, : कमी पाऊस आणि जलसंवर्धनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील भूजलपातळी चिंताजनकरीत्या खालावली आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण जलसंकटाची शक्यता निर्माण झाली आहे.
सप्टेंबर २०२६ च्या नोंदीनुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत नागपूर शहराची भूजलपातळी तब्बल १.७२ मीटरने, तर जिल्ह्यातील १३ तालुक्यांची पातळी सरासरी १.१७ मीटरने खोल गेली आहे.
जिल्ह्यातील १११ निरीक्षण विहिरींच्या नोंदींवरून ही बाब समोर आली आहे. यामध्ये भिवापूर आणि नागपूर तालुक्यात सर्वाधिक घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या नोंदींतून स्पष्ट झाले आहे. भूजलपातळीच्या नोंदी घेण्यासाठी डोंगराळ भाग (रन ऑफ झोन), नदी-नाले व प्रवाह परिसर (रिचार्जिंग झोन)