GST Fraud Nagpur: नागपुरात २५ लाखांचा जीएसटी घोटाळा उघड; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Fake GST Registration Scam Uncovered in Nagpur: नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जीएसटी क्रमांक मिळवून शासनाला २५ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खोट्या ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’द्वारे ही आर्थिक फसवणूक करण्यात आली.
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे जीएसटी क्रमांक मिळवून आणि खोटा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ दर्शवून शासनाच्या महसुलाला २५ लाख रुपयांचा चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार शहरात उघडकीस आला.