नागपूर : वेणा नदीत आढळला महिलेचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Gumgaon Woman dead body found in Venna River

नागपूर : वेणा नदीत आढळला महिलेचा मृतदेह

गुमगाव : हिंगणा तालुक्यांतर्गत गुमगाव येथील वेणा नदी पात्रात शनिवारी सकाळच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लिलाबाई (सरस्वता) लक्ष्मण सोनकुसळे असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत लिलाबाई या पहाटेच्या सुमारास नियमित फिरायला जात होत्या. शनिवारी फिरायला जात असताना त्यांनी काही स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधल्याचे सांगण्यात आले. मात्र सकाळी ८ वाजता अज्ञात महिलेचा मृतदेह गुमगाव-कोतेवाडा गावाजवळील वेणा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र यावेळी त्या महिलेची ओळख पटू शकली नाही; परिणामी मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात आला.

सोशल मीडियावरून पटली ओळख

दरम्यान व्हाट्सॲपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताचा फोटो व्हायरल झाला. अशातच कामावर गेलेल्या लिलाबाईंच्या मुलांना काही परिचित व्यक्तींनी फोटोबाबत कळविले. त्यानुसार दत्तात्रय व निलेश नामक मुलांनी ग्रामीण रुग्णालय गाठून लिलाबाईची ओळख पटविली. नदीवर हातपाय धुवायला गेल्या असता लिलाबाईंचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा पुढील तपास हिंगण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक कुथे, संजय तिवारी करीत आहे.

Web Title: Nagpur Gumgaon Woman Dead Body Found In Venna River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top